Edition

समाजातील ढासाळणारा विवेक पाहता नव्या पिढीला संस्कार आणि नागरिकांचे प्रबोधन होण्याची जबाबदारी, जागृत व्यक्तींनी स्वीकारायला हवी.- आम.सतेज पाटील.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव सावंत यांचा जाहिर नागरी सत्कार
———————————–
कोल्हापूर :
चौफेर नजर फिरवली असता समाजातील अत्यंत नकारात्मकता, विद्वेष, दुष्टता जास्त जाणवायला लागली आहे. जात धर्म पंथ यांच्या द्वेष्यात वाढ झाल्याची दिसत आहे. विचारशील माणसांनी आणि कृतिशील नागरिकांनी समाज शिक्षणाचे कार्यक्रम अविरत आयोजित करण्याची गरज आहे.
शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि संतांची शिकवण असणारा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र वैचारिक मागास होऊ नये, याची आपण काळजी घेवु.
आज सन्मानीत होणाऱ्या पुरस्कार्थींनी समाजप्रबोधनाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी, असे मनोगत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्रद्वारा आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंती निमित्त राज्य व राष्ट्रीय पुरस्कार 2026 कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी सर्व राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. आपल्या हस्ते समाजातील जनमाणसाचे कल्याणचे कार्य सुरु राहो आणि येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक विचार समाजात पाझरायला हवे असे मार्गदर्शन केले.
दोन्ही मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव नाना सावंत यांचा जाहिर नागरी सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला क्रिडा, संघटना अध्यात्मिक, आरोग्य, पत्रकारीता, उद्योग, कृषी, योगा, शासकिय व निम शासकीय सेवेत वैशिष्ठयपूर्ण कार्य तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी सेवाभावीवृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करतात, अशा कार्यकर्त्यांना समाज भूषण, समाज रत्न, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक/शिक्षिका, कामगार भूषण, कामगार रत्न, सहकार भूषण, कला भूषण, कृषी रत्न, साहित्य भूषण, . उद्योग भूषण, उद्योग रत्न, आदर्श योग शिक्षक/शिक्षिका, आदर्श माता आदि. पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सखाराम जाधव – गोरक्षा संस्थेचे उपाध्यक्ष, प्रभाकर कांबळे – जेष्ठ सहकार तज्ञ, अनिल म्हमाने – अध्यक्ष निर्मिती विचारमंच, संदीप गुरव, राजेंद्र निकम, सचिन खराडे, संघसेन जगतकर तसेच राहूल चव्हाण – 2026 मधील जागतीक योगासन स्पर्धेत सिल्व्हर मेडल विजेता आदी. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलनाने करणेत आली.
मान्यवर पाहुण्यांचे ग्रंथ, पुष्पगुच्छ, फेटा व बॅच लावून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुरेश केसरकर यांनी केले. प्रास्ताविकामध्ये दोन्ही संस्थांच्या एकूणच कार्याचा आढावा विषद केला. तर आभार अनिता काळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय सासने, संभाजी थोरात, भगवान माने, संजय चव्हाण, शिवाजी चौगुले, महादेव चक्के, रघुनाथ मुधाळे, दिनकर आडसूळ, सुभाष पाटील, संजय गुरव, सर्जेराव हळदकर, विजय आरेकर, स्वप्नील गोरंबे आदींनी विशेष सहकार्य केले.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!