Edition

कोठा येथील महिलेची दगडाने ठेचून हत्या; पती पोलिसांच्या ताब्यात.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी – संतोष भालेराव, वाशिम : शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम कोठा येथे २४ जून रोजी कविता रामेश्वर इंगळे या तीस वर्षीय विवाहित महिलेची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. सदर घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. हत्या झालेली विवाहित महिला ही कोठा येथे अंगणवाडी सेविका होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पती-पत्नीमध्ये वाद असल्याने सदर महिला तिचे माहेर बेलखेडा येथे राहत होती. तसेच नोकरीच्या निमित्ताने बेलखेडा येथून दररोज कोठा येथे अंगणवाडी सेविका म्हणून जाणे-येणे करत होती. दरम्यान २४ जून रोजी दुपारच्या दरम्यान कोठा ते येवता रस्त्यावर या महिलेची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.
सदर घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. घटनास्थळावरून सदर महिलेच्या पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वृत्त लिहेपर्यंत सदर घटनेची फिर्याद देण्याची प्रक्रिया शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये सुरू होती.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!