Edition

खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे जागतिक योग दिन साजरा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

खोतवाडी प्रतिनिधी – शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात योगाचे काय महत्व आहे हे आपल्या मनोगतातुन सांगितले.
त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा सर यांनी नियमित योगा केल्यामुळे आपले आरोग्य कसे चांगले राहते या विषयी माहिती आपल्या मनोगतातुन सांगितली.
यानंतर विद्यालयातील श्री. हेमगिरे एस.के.सर यांच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांकडून योगाची विविध आसने करवुन घेण्यात आली.यामध्ये प्राणायाम,कपालभाती,भुजंगासन,
ताडासन ,मक्रासन इत्यादी योगासनाचे प्रकार करुन घेण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा सर ,विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. यासीन मुजावर सर सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.सी.बी.समाजे सर यांनी केले.तर आभार श्री.पी.के.चौगुले सर यांनी मानुन योग दिनाच्या कार्यक्रमाची सांगता केली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!