Edition

आसगावच्या जिजाऊ पाटीलने तलवारबाजीत सुवर्णपदक जिंकले,राष्ट्रीय स्पर्धेत सलग पाचवे पदक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी.
पन्हाळा तालुक्यातील आसगाव येथील जिजाऊ पाटील हिने राष्ट्रीय कॅडेट फेन्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. सलग पाचव्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवण्याचा विक्रम तिने नोंदवला आहे.महाराष्ट्रातील ही पहिलीच खेळाडू ठरली आहे जिने सलग पाच वर्षे राष्ट्रीय पदकांची कमाई केली आहे.उत्तराखंड येथे २६ मे २०२६ रोजी पार पडलेल्या १२ व्या राष्ट्रीय कॅडेट फेन्सिंग स्पर्धेत जिजाऊने फॉईल प्रकारात सुवर्ण तर सेबर फॉईल प्रकारात कांस्यपदक मिळवले.अंतिम सामन्यात तिने चंदीगडच्या जिया शर्माचा १५-८ असा पराभव केला. या कामगिरीमुळे तिची एस्टोनिया येथे होणाऱ्या जागतिक कॅडेट फेन्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
सध्या जिजाऊ अहमदाबाद येथील विजय भारत स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये इटलीचे प्रसिद्ध प्रशिक्षक अँड्रे वेल्ट्री यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.तिच्या प्रशिक्षणावर आतापर्यंत सुमारे साडेसहा लाख रुपये खर्च झाले आहेत. जिजाऊचे प्राथमिक शिक्षण आसगाव येथील अक्षरनंदन मराठी शाळेत झाले असून सध्या ती नव्या इयत्तेत शिकत आहे.तिला प्रसाद डुंगर,
विजयकुमार यांचे प्रशिक्षण लाभत आहे.वडील पी.डी. पाटील,आई जीवन पाटील आणि मनीषा पाटील यांचे मोलाचे प्रोत्साहन तिला मिळत आहे.यापूर्वी थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जिजाऊने रौप्यपदक पटकावले होते.या कामगिरीची दखल घेत भारतीय क्रीडा प्राधिकरण व फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या ‘प्रतिभा ओळख व विकास समिती’ने तिची ‘खेलो इंडिया ॲथलिट’ म्हणून निवड केली आहे.यंदा तिने लातविया, बल्गेरिया,पोलंड येथील युरोपियन कॅडेट सर्किट स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. २०२७ मध्ये जर्मनी,फ्रान्स,हंगेरी आणि स्वीडनसह युरोपियन देशांतील स्पर्धांमध्ये ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!