Edition

झोपडपट्टी सुरक्षा दलाचा 31 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी –
सामाजिक न्याय, गायरान जमीनवर शासकीय निमशासकीय वसलेले अतिक्रमणे मन नियमानुकूल खाजगी जागेवर झोपडपट्टीधारकांचे हक्क कामगार व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या झोपडपट्टी सुरक्षा दल या संघटनेचा 31 वा वर्धापन दिन पुण्यात हडपसर ससाणे नगर येथील म्हाडा कॉलनीत शाखा कार्यालयाचे उद्घाटन करून उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात महापुरुषांच्या प्रतिमेस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच शाखा कार्यालयाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर निलेश मगर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भगवानराव वैराट यांनी आपल्या भाषणात म्हणाले गेली 31 वर्ष सातत्याने मोर्चा, आंदोलने, धरणे करून झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन, घरकुल, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, श्रमजीवी कामगारांचे प्रश्न व हक्क आणि महिलांवर होणारे अत्याचार विरोधात तसेच बेरोजगारी दलित अत्याचार महागाई शेतकरी बांधवांचे प्रश्न खाजगी सावकारी कंपन्या विरोधात लढा पुकारून जनकल्याणासाठी संघटना सातत्याने आक्रमकपणे जनतेच्या प्रश्नासाठी लढा उभारण्याचा निर्धार केला. यावेळी नगरसेवक खंडू लोंढे, प्रा. आसमा शेख, इम्तियाज मोमीन, हरिभाऊ वाघमारे, काशिनाथ गायकवाड, मोहंमद शेख, दत्ता डाडर, सुरेखा भालेराव, गणेश लांडगे, वंदना पवार, बाळासाहेब सुपेकर, दिना शेखर, संजय बंडे, शिवाजी भिसे, प्रवीण सपकाळ, अभिजीत ननावरे, चंद्रकांत कांबळे, श्याम सोनवणे, वैशाली अवघडे, पल्लवी कंदकल, दीपक आटोळे, गणेश गायकवाड, नितीन बोराडे, इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरची प्रतिमा आणि संविधानाची प्रत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार संघटनेचे राज्य सरचिटणीस काशिनाथ गायकवाड यांनी मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!