Edition

अरिहंता चॅरिटेबल फाउंडेशनला डॉ. अजित व शोभा नायक दाम्पत्याची ₹1.50 लाखांची देणगी; गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रायबाग, दि. २ : अरिहंता चॅरिटेबल फाउंडेशन, रायबाग या संस्थेसाठी नगर येथील डॉ. अजित नायक आणि सौ. शोभा नायक या दाम्पत्याने १ लाख ५० हजार रुपयांची देणगी दिली आहे. या निधीचा उपयोग तालुक्यातील हुशार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी.सी. सदलगी यांनी दिली.
पट्टण महावीर सभागृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव मल्लाप्पा खनत्ती यांनी सांगितले की, रायबाग तालुक्यातील जैन समाजातील २०२५-२६ शैक्षणिक वर्षात एसएसएलसी (SSLC) परीक्षेत ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे तसेच पीयूसी (PUC) परीक्षेत ८५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.
यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी १५ जुलैपर्यंत संस्थेकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. या योजनेचा लाभ तालुक्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेला देणगीदार डॉ. अजित नायक, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संजय बदोरे, संचालक इरगौडा पाटील, दशरथ शेट्टी, शीतल बेडीकिहाळे, संजय हंजे, परिस उगारे, भारतेश पाटील, नेमनाथ आस्की, वर्धमान बनवणे, भारतेश कोरगेरी आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!