Edition

शिक्षकांचे पगार दर महिन्याच्या १ तारखेलाच करणार – शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचे आश्वासन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ईश्वरपूर प्रतिनिधी :
सांगली जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने जिल्हा परिषद सांगली येथे मुख्य वित्त व लेखा अधिकारी तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध प्राथमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांच्याकडे वैद्यकीय बिलांना तात्काळ मंजुरी देणे, भविष्य निर्वाह निधी हिशोब तक्ते उपलब्ध करून देणे, सातवा वेतन आयोग पडताळणीसाठी तालुकास्तरावर विशेष शिबिरे आयोजित करणे, पेन्शन फरकाबाबत तातडीने कार्यवाही करणे तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन प्रस्ताव मंजूर करणे या मागण्या करण्यात आल्या. प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्यासोबत झालेल्या चर्चेत शिक्षक समन्वय समितीला दर दोन महिन्यांनी समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक देणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार टीईटी पात्रतेची मुदत ऑगस्ट २०२८ पर्यंत असल्याचा उल्लेख करून पदोन्नती प्रक्रिया सेवाज्येष्ठतेनुसार राबविणे, शिक्षकांना वर्षभर चालणारी बीएलओची अशैक्षणिक कामे न देणे, सेवापुस्तक पडताळणीसाठी तालुकास्तरावर शिबिरे घेणे, विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे तसेच उच्च प्राथमिक व केंद्रशाळांमध्ये शिपाई व लिपिकांची नियुक्ती करणे या मागण्यांवर चर्चा झाली.यावेळी शिक्षकांचे पगार दर महिन्याच्या १ तारखेलाच होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शरनाथे व सदाशिव वारे यांनी दिली. पगार बिले वेळेत सादर करण्याची सूचना शालार्थ टीमला केली आहे. जास्तीत जास्त महिन्याच्या 22 तारखेला एम.टी.आर निघून प्रक्रिया पूर्ण केली जाईल. पगाराचे अनुदान प्राप्त होताच पगार वेळेवर करण्यात येईल. शालार्थ टीमने शिक्षकांचे पगार खाते बदल करू नये त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होऊन पगाराला विलंब होतो. अशी सूचना मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुनंदा ठवळे यांनी दिली. या महिन्याचा पगार १ तारखेला केल्याबद्दल मोहनराव गायकवाड शिक्षणाधिकारी यांचे सर्व संघटना यांचे वतीने आभार व्यक्त केले. बैठकीस सांगली जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शरनाथे, सरचिटणीस सदाशिव वारे, कार्याध्यक्ष संतोष कदम, सहसरचिटणीस शशिकांत पाटील, प्रसिद्धीप्रमुख चंद्रशेखर क्षिरसागर, उपाध्यक्ष दिवाणजी देशमुख यांच्यासह समन्वय समिती सदस्य मुकुंद सूर्यवंशी, विनायक शिंदे, अरविंद गावडे, मुरलीधर दोडके, प्रमोद काकडे, मनोहर साबळे, रमेश पेटकर, उत्तम इंगळे, राजेंद्र कांबळे, परशुराम जाधव, अन्सार तांबोळी, अजय राक्षे, बाबासो जानकर, मुकुंद पंडीत तसेच शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळ : शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना निवेदन देताना समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शरनाथे, सचिव सदाशिव वारे, चंद्रशेखर क्षीरसागर,विनायक शिंदे व पदाधिकारी

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!