Edition

खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी मध्ये महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल,खोतवाडी ता.हातकणंगले, जि.कोल्हापुर. येथे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी झाली.
या कार्यक्रमाची सुरवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा पुजनाने व दिपप्रज्वलनाने करण्यात आली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.यासीन मुजावर सर व विद्यायाचे पर्यवेक्षक श्री.शांतीनाथ मगदुम यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले.
यानंतर विद्यालयातील विद्यार्थीनी कु.संध्या नवनाथ गेजगे इयत्ता 8 वी हिने महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनचरित्रा विषयी माहिती आपल्या मनोगतातुन सांगितली.
तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.शांतीनाथ मगदुम सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रीयांच्या व मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याची माहिती आपल्या मनोगतातुन सांगितली.
तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.यासीन मुजावर सर यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातुन सांगितली.
याप्रसंगी सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.समाजे सी.बी.यांनी केले तर सौ.पाटील एम.एम.यांनी आभार मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!