हुपरी वृत्तसेवा – हुपरी नगरपरिषद मासिक सभा शुक्रवार दि. 27/11/2026 रोजी नगरपरिषद सभागृहात किरकोळ वाद व आमरण उपोषणानाच्या विषयावर पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मंगलरावजी माळगे उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे, मुख्याधिकारी अजय नरळे,सर्व नगरसेवक नगरसेविका नगरपरिषद विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत उशीरा चालली ही सभा व प्रभाग क्रमांक 9 च्या नगरसेविका सोनाली जाधव व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव हे भडांरखानाच्या निधी संदर्भात उपोषणाला बसले असता त्यांचे उपोषण सोडवण्यात सत्ताधारी पक्षास यश मिळाले तर इतर सभेच्या विषयात जेष्ठ नगरसेवक अण्णासाहेब शेडुंरे यांनी प्रशासना वर प्रश्नाचा भडिमार करत असता नगराध्यक्ष यांनी पहिल्या वेळी सभा 1 तासासाठी तहकूब करण्यात आली असे जाहीर केले व पुन्हा सभा सुरू झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 9 च्या नगरसेविका यांचे उपोषण सोडवण्यात तास भर उलटल्याने पुन्हा जेष्ठ नगरसेवक अण्णासाहेब शेडुंरे आक्रमक पणे सभा त्याग करुन बाहेर पडले त्यानंतर इतर विषयांवर मात्र सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.अखेर इतर सर्व 40 विषयाचे वाचन करण्यात आले.










