मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने २० नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेले हे शासन परिपत्रक अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांना OBC विद्यार्थ्यांप्रमाणेच शैक्षणिक सवलती आणि शुल्क माफीचा लाभ मिळणार आहे.
📌 या निर्णयाची महत्त्वाची वैशिष्ट्ये:
✅ शुल्क सवलत: शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्कासह प्रवेश शुल्क, विद्यार्थी सहाय्य निधी, कॉलेज मॅगझीन फी, विमा निधी, ग्रंथालय शुल्क, अश्वमेध निधी, जिमखाना शुल्क, नोंदणी शुल्क, वैद्यकीय मदत निधी आणि विद्यार्थी ओळखपत्र शुल्क यामध्येही सवलत मिळणार.
✅ लागू विद्यापीठे:
१. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
२. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
३. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
४. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
✅ प्रवेश प्रक्रियेत अडथळा नाही: OBC प्रवर्गापेक्षा अधिक शुल्क मराठा विद्यार्थ्यांकडून घेतले जाणार नाही आणि शुल्क न भरल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडथळा येणार नाही, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत.
हा निर्णय मराठा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक आणि दिलासादायक पाऊल आहे. 🎓✨
📌 शासन परिपत्रक क्र.: कृशिवि-३७२६/प्र.क्र.१५३/ई-१८९८५७३/७-अ
📌 संगणक संकेतांक: २०२६११२०१४४९०९४१४६









