Edition

सदलग्यातील छ. शिवाजी महाराज चौकात दिवाळी पाडव्यानिमित्त भव्य दीपोत्सव साजरा, शिवगर्जनेने परिसर दणाणला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सदलगा प्रतिनिधी –
सदलगा येथील छ. शिवाजी महाराज चौकात दिवाळी पाडव्यानिमित्त समस्त हिंदू बांधवांच्यावतीने भव्य दीपोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

संध्याकाळी सूर्यास्त होताच छ. शिवाजी महाराज पुतळ्याचा संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. पुतळ्याच्या आवारात समस्त हिंदू महिला-पुरुष, युवक-युवती, लहान मुले मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. सर्वांनी हातात पणत्या घेऊन एकाच वेळी पणत्या उजळवल्या. त्यामुळे संपूर्ण चौक दीपांच्या प्रकाशाने झगमगून गेला. पणत्यांच्या प्रकाशात शिवाजी महाराजांचा पुतळा अधिकच तेजस्वी दिसत होता.

त्यानंतर उपस्थितांनी एकजुटीने शिवगर्जनेची ललकारी दिली. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची विधिवत आरती करण्यात आली. आरतीनंतर फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली. आकाशात उडणाऱ्या फटाक्यांमुळे दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणित झाला.

हा दीपोत्सव म्हणजे केवळ दिव्यांचा उत्सव नव्हता, तर हिंदू समाजाच्या एकजुटीचे, संस्कृतीचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेल्या श्रद्धेचे प्रतीक होता. दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी एकत्र येऊन दीपोत्सव साजरा केल्याने समाजात बंधुभाव, एकता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी येथील सकल मराठा समाज, समस्त हिंदू बांधव, राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या सदस्या, महिला-पुरुष, युवक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडला. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी या दीपोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

शेवटी सर्वांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

गोकुळ अध्यक्ष निवडणुकीचा सस्पेन्स कायम! हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश; चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार चार तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाचा निर्णय; चार संचालकांची मते स्वतंत्र मतपेटीत, मतदानाचे व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक

शिवरायांचा गौरवशाली इतिहास जिवंत करणारा अप्रतिम किल्ला. साताऱ्याच्या बाल शिवशिलेदारांची अनोखी कलाकृती, तन्मय आणि रुद्र अश्विनी प्रकाश वरक या बंधूंनी साकारला ऐतिहासिक गड-किल्ल्याचा देखणा नमुना

traffic tail

गोकुळ अध्यक्ष निवडणुकीचा सस्पेन्स कायम! हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश; चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार चार तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाचा निर्णय; चार संचालकांची मते स्वतंत्र मतपेटीत, मतदानाचे व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक

error: Content is protected !!