Edition

जनता शिक्षण संस्थेच्या गौरवशाली परंपरेला लाभलेले दूरदर्शी नेतृत्व : मा. मदनदादा भोसले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

काही व्यक्ती केवळ संस्था चालवत नाहीत, तर आपल्या दूरदृष्टीने संस्थेचा इतिहास आणि भविष्य दोन्ही घडवतात. त्यांच्या विचारांतून नवे उपक्रम जन्म घेतात, त्यांच्या निर्णयांतून विकासाला दिशा मिळते आणि त्यांच्या कार्यातून असंख्य माणसांना प्रेरणा मिळते. जनता शिक्षण संस्था, वाईचे अध्यक्ष तथा मा.आमदार मा. मदनदादा भोसले हे अशाच कर्तृत्ववान नेतृत्वाचे एक प्रेरणादायी उदाहरण आहेत.

दादांच्या नेतृत्वाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे बदलत्या काळाची गरज ओळखून शिक्षणाला आधुनिकतेची जोड देण्याची त्यांची दूरदृष्टी. शिक्षण केवळ पदवी मिळविण्याचे साधन न राहता विद्यार्थ्यांना कौशल्य, आत्मविश्वास आणि रोजगाराची संधी देणारे माध्यम बनले पाहिजे, हा त्यांचा विचार आहे. याच विचारातून किसन वीर महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राची स्थापना करून त्यांनी एक भव्य सेंटर ऑफ एक्सलन्स उभारले. या केंद्राच्या माध्यमातून सध्या ११ विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण आज दिले जात आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष कामाचे कौशल्य मिळावे आणि बदलत्या औद्योगिक क्षेत्रात त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील व्यापक दृष्टिकोन आहे.

अल्पावधीत दादांनी किसन वीर महाविद्यालयाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. महाविद्यालयाच्या भौतिक सुविधांपासून ते शैक्षणिक उपक्रमांपर्यंत झालेला सकारात्मक बदल त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाची साक्ष देतो. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. नामवंत वक्ते, विचारवंत आणि विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींना महाविद्यालयात आमंत्रित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी त्यांचा विशेष आग्रह असतो.

दादांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे निसर्गप्रेम. झाडे, फुले आणि हिरवाई यांच्याबद्दल त्यांना विशेष आत्मीयता आहे. त्यांच्या मते, झाडाप्रमाणे माणसाचेही जीवन बहरले पाहिजे आणि त्याने इतरांना आधार, सावली व आनंद दिला पाहिजे. महाविद्यालयाच्या परिसरातील हिरवाई आणि सौंदर्यवृद्धीमधून त्यांच्या या आवडीचे दर्शन घडते.

संशोधन, कौशल्य विकास, रोजगाराभिमुख शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास या चारही गोष्टींचा सुंदर समन्वय साधण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. संशोधकांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्याची त्यांची वृत्ती आम्हा प्राध्यापकांसाठीही प्रेरणादायी आहे. मोठेपण पदामुळे नव्हे, तर आपल्या कार्यामुळे निर्माण होते, याची जाणीव दादांच्या कार्यातून होते.

आदरणीय दादा, आपल्या नेतृत्वाखाली किसन वीर महाविद्यालयाने विकासाची अशीच नवनवी शिखरे गाठावीत, हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा मिळावी आणि आपल्या कार्याचा सुगंध सर्वदूर दरवळत राहावा. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उदंड यश लाभो, हीच वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा!

*डॉ. संदीप बी. वाटेगावकर*
रिसर्च डायरेक्टर, किसन वीर महाविद्यालय, वाई

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!