
विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.
मलिकवाड,( ता.चिकोडी )येथील ज्येष्ठ महिला हौसाबाई बंडू शिरोळे (वय ८५) यांचे गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच मलिकवाड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
हौसाबाई शिरोळे या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य होत्या.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शिरोळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांचा रक्षाविसर्जन विधी शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे.









