Edition

मुख्य मार्गावर दिवाळी बाजाराला मनाई; न्यायालयीन आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करणार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी : प्रविण केर्ले

इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर दिवाळी बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त पल्लवी पाटील आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त बैठकीत घेतला.

दिवाळीच्या काळात मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात स्टॉल, मंडप आणि तात्पुरती दुकाने उभारली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी, पादचाऱ्यांना अडथळे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर मुख्य मार्गावरील दिवाळी बाजाराबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य रस्त्यावर बाजार भरविण्यास मनाई असल्याने त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाहतूक व्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुख्य रस्त्यावर स्टॉल उभारल्यास कारवाई

मुख्य मार्गावर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत स्टॉल, मंडप किंवा विक्री साहित्य उभारून जागा अडविण्यास परवानगी दिली जाणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वय ठेवून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे ठरविले.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपआयुक्त नंदू परबकर यांच्यासह महापालिका आणि पोलीस प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दिवाळी सणाच्या उत्साहात नागरिकांना सुरक्षितपणे खरेदी करता यावी, वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ नयेत आणि न्यायालयीन आदेशांचे पालन व्हावे, यासाठी व्यापारी, विक्रेते आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

भीमाशंकर जंगलतोडीवरून राजकीय वातावरण तापले; टोरंट पॉवरच्या प्रकल्पावर पर्यावरणीय प्रश्न, ३ लाखांहून अधिक झाडे तोडली जाणार असल्याचा आरोप; कंपनी आणि वनविभागाकडून नियमांचे पालन केल्याचा दावा

traffic tail
error: Content is protected !!