Edition

हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयाचा ईश्वरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोष पेढे वाटून आनंदोत्सव; फटाक्यांची आतषबाजी करत विजयाच्या घोषणा..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हर्षदा देशमुख-जाधव विजयी झाल्याबद्दल ईश्वरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. तसेच पक्ष कार्यालयासमोर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार हर्षदा देशमुख-जाधव आणि महाविकास आघाडीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
या आनंदोत्सवात ईश्वरपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, गटनेत्या अरुणादेवी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने, शहराध्यक्षा पुष्पलता खरात, सभापती संदीप माने, नगरसेवक सुनील मलगुंडे, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, शंकरराव चव्हाण, संचालक शैलेश पाटील, रमेश हाके, माजी संचालक श्रेणिक कबाडे, माजी नगरसेवक विजय कुंभार, निवास पाटील, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, पदवीधरचे राज्य उपाध्यक्ष विशाल सूर्यवंशी आणि तालुकाध्यक्ष अभिजित शिंदे आदी उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रातील युवक आणि पदवीधरांनी सरकारविरोधात दिलेला कौल म्हणजे हर्षदा देशमुख-जाधव यांचा विजय असल्याची भावना नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव यांनी व्यक्त केली. या विजयात माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे आहे. हर्षदा देशमुख-जाधव या अभ्यासू, तरुण आणि कार्याचा वारसा असलेल्या नेत्या आहेत. त्या पदवीधरांच्या प्रश्नांना निश्चितपणे न्याय देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पदवीधरचे तालुकाध्यक्ष अभिजित शिंदे यांनी स्वागत केले, तर राज्य उपाध्यक्ष विशाल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. संचालक शैलेश पाटील यांनी आभार मानले.
यावेळी दिग्विजय पाटील, अभिजित कुर्लेकर, पदवीधर तालुका उपाध्यक्ष संग्राम पाटील, सरचिटणीस शैलेश पाटील, अरुण पाटील, साहेबराव जाधव, सुनंदा साठे, मनिषा पेठकर, प्रियांका साळुंखे, संजय जाधव, संजय खवळे, अबिद मोमीन, मासूम गणीभाई, राजेंद्र बाणेकर, परेश पाटील, राजू अडसूळ, रविंद्र वाघमोडे, रवि सूर्यवंशी, मिलिंद पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

तारदाळकरांच्या एकजुटीने दोन चिमुकल्यांना शोधले; सहा तासांच्या धावपळीनंतर पालकांच्या जीवात जीव! शाळेतून घरी परतल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याने उडाली खळबळ; ग्रामस्थ, तरुण, शिक्षक आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांना यश

traffic tail

तारदाळकरांच्या एकजुटीने दोन चिमुकल्यांना शोधले; सहा तासांच्या धावपळीनंतर पालकांच्या जीवात जीव! शाळेतून घरी परतल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याने उडाली खळबळ; ग्रामस्थ, तरुण, शिक्षक आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांना यश

error: Content is protected !!