कोल्हापूर/ प्रविण केर्ले : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या स्वीकृत सदस्यपदी माजी आमदार सत्यजित पाटील (आबा) सरुडकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, महाविकास आघाडीकडून त्यांना संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोकुळच्या निवडणुकीत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना साथ देत सत्यजित पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना गोकुळमध्ये स्वीकृत सदस्यपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, त्यांच्या नियुक्तीबाबत अधिकृत घोषणा झालेली नसल्याने या चर्चेला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.










