Edition

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

इस्लामपूर प्रतिनिधी –

खासदार मा. प्रणितीताई शिंदे यांच्या दि. १५/१०/२०२६ रोजीच्या सोशल मीडिया पोस्टवर अश्लील, अत्यंत खालच्या दर्जाची व महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी डॉ. सचिन शेळके यांच्याविरुद्ध महिला काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस “अॅड. मनीषा रोटे” यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा “सौ. संध्याताई सव्वालाखे” यांच्या मार्गदर्शनाखाली ही कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पुढे नेण्यात आली आहे.लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, मतभेद व्यक्त करताना महिलांविषयी अश्लील भाषा वापरणे, त्यांच्या प्रतिष्ठेवर वैयक्तिक हल्ले करणे आणि सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिलांचे चारित्र्त्यहनन करण्याचा प्रयत्न करणे, हे कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरू शकत नाही. वैचारिक विरोधाला विकृत आणि अपमानास्पद भाषेची जोड देणे ही लोकशाही मूल्यांची पायमल्ली आहे.
आज महिला राजकारण, सामाजिक कार्य, शिक्षण, प्रशासन आणि इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. मात्र, सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिलांना सोशल मीडियावरून अशा प्रकारच्या अश्लील टिप्पण्या, वैयक्तिक बदनामी आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असेल, तर ही संपूर्ण समाजासाठी चिंतेची बाब आहे. महिलांच्या कर्तृत्वाला वैचारिक उत्तर देण्याऐवजी त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणे, ही पुरुषप्रधान आणि विकृत मानसिकतेची लक्षणे आहेत.खासदार प्रणितीताई शिंदे या जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या राजकीय भूमिकांशी कोणाचे मतभेद असू शकतातय मात्र, त्या मतभेदांच्या नावाखाली महिलांविषयी अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरण्याचा परवाना कोणालाही मिळत नाही. अशा टिप्पण्यांमुळे संबंधित महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचण्याबरोबरच समाजातील इतर महिलांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. विशेषतः नव्या पिढीसमोर महिलांशी सन्मानाने वागण्याचा आदर्श निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक सुशिक्षित नागरिकाची आहे.या प्रकरणी अॅड. मनीषा रोटे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, ‘महिलांच्या सन्मानाशी तडजोड केली जाणार नाही.” सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या महिलांवर अशा प्रकारे वैयक्तिक आणि अश्लील स्वरूपाचे हल्ले होत असतील, तर महिला काँग्रेस ते मूकपणे सहन करणार नाही. महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे आणि सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वर्तनाला कायद्याच्या चौकटीत उत्तर देणे, ही काळाची गरज आहे. इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याने आता पोलिसांनी या प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल आणि वेगवान तपास करावा. संबंधित सोशल मीडिया पोस्ट, कमेंट्स, डिजिटल पुरावे आणि आरोपीची भूमिका यांची योग्य पडताळणी करून कायद्यानुसार आवश्यक ती कठोर कारवाई करावी, अशी महिला काँग्रेसची ठाम मागणी आहे.गुन्हा नोंदवूनही तपासात अनावश्यक विलंब होत असल्याचे दिसून आल्यास महिला काँग्रेस लोकशाही मार्गाने आणि कायदेशीर चौकटीत पुढील आंदोलनात्मक भूमिका घेईल.” महिलांच्या सन्मानासाठी आवाज उठवणे हा आमचा अधिकार आणि सामाजिक बांधिलकी आहे. कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावाला बळी न पडता कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. संबंधित प्रकरणात कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करून दोष सिद्ध झाल्यास संबंधितांना योग्य शिक्षा मिळावी, ही आमची ठाम भूमिका आहे. महिलांचा सन्मान हा केवळ एका पक्षाचा किंवा एका व्यक्तीचा प्रश्न नाहीय तो समाजाच्या सभ्यतेचा आणि लोकशाहीच्या मूल्यांचा प्रश्न आहे. प्रणितीताई शिंदे यांच्यावरील आक्षेपार्ह टिप्पणीच्या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत महिला काँग्रेस आपली भूमिका ठामपणे मांडत राहील.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

traffic tail

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

error: Content is protected !!