Edition

‘किसन वीर’ च्या विद्यार्थ्यांचा सातारा आकाशवाणीवर कार्यक्रम

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वाई: दि.२१ ऑक्टोबर २०२६

२०२६ या चालू वर्षात वेणूताई चव्हाण, यांची तर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची २०२७ मध्ये जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्त येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील मराठी विभाग आणि वाड्.मय मंडळाच्या वतीने ‘साताऱ्याचे भूषण स्वर्गीय वेणूताई चव्हाण आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना समजून घेताना’ या विषयावर वाड्.मय मंडळाचे समन्वयक प्रो. डॉ. संग्राम थोरात यांनी लिहिलेल्या संहितेचे वाचन वेदिका सणस या विद्यार्थिनीने सातारा आकाशवाणीवर केले. तसेच सायुरी सणस हिने तिच्या स्वरचित कविता तर संध्या मांढरे हिने मांढरदेवीच्या काळूबाईची लोकगीते सादर केली. या कार्यक्रमाचे निवेदन महाविद्यालयातील एम.ए.भाग एकची विद्यार्थिनी व सध्या मानसशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या वीणा जाधव यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांचे पाठबळ, जेष्ठ विचारवंत श्रीधर साळुंखे यांच्या शुभेच्छा, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे व मराठी विभागप्रमुख प्रो. डॉ. चंद्रकांत कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. संदीप वाटेगावकर, धनश्री भोसले, जितेंद्र चव्हाण, प्रियांका मोरे यांचेही सहकार्य लाभले.
सातारा आकाशवाणीच्या मराठी साहित्य पत्रिका आविष्कार *साहित्य रंग युवा प्रतिभेचे* या कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निर्मात्या वैदेही कुलकर्णी यांची ही संकल्पना असून, सातारा जिल्ह्यातील वाईच्या किसन वीर महाविद्यालयाला असा कार्यक्रम करण्याची प्रथम संधी मिळाली आहे. कार्यक्रमाचे प्रसारण सातारा आकाशवाणीवरुन शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०९:३० वाजता होणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा आस्वाद वाई पंचक्रोशी आणि सातारा  आकाशवाणीच्या क्षेत्रातील रसिक श्रोत्यांनी ध्यावा असे आवाहन वाड्.मय मंडळाचे समन्वयक प्रो. डॉ. संग्राम थोरात व प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

traffic tail

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

error: Content is protected !!