गांधीनगर:प्रतिनिधी
उदय साळुंखे
गांधीनगर ता.करवीर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापार पेठ असून जिवना आवश्यक सर्वच वस्तुची होलसेल व रिटेल बाजरपेठ असून गांधीनगरमध्ये ही दाटीवाटीची लोकवस्ती असल्याने तसेच खरेदीसाठी बाहेरून येणाऱ्या ग्राहकांची संख्या फारमोठी असून सध्या भटक्या कुत्र्यामुळे गांधीनगर ही त्रस्त असून गांधीनगर मध्ये कुत्रे चावण्याची संख्या लक्षणीय आहे. गांधीनगर वसाहत रूग्णालयात कुत्रा चावल्यानंतर लस घेणाऱ्यांची संख्या ही दिवसात तीन ते चार जणांची असून ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाचीआपण भटक्या कुत्रांचा ताबडतोब बंदोबस्त करावा तसेच कचरा डेपो मुळे ही मोठया प्रमाणात कुत्री पिसाळण्याचे प्रमाण वाढले असून त्याचाही विचार करून ताबडतोब भटक्या कुत्राचा बंदोबस्त करावा व गांधीनगर मधील नागरिकांना दिलासा दयावा अन्यथा पुढील आंदोलन हे कार्यालयात भटकी कुत्री सोडण्याचे आंदोलन करण्यात येईल होणाऱ्या परिणामास आपले कार्यालय जबाबदार असेल अशी करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे.
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की गांधीनगर मधील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त ग्रामपंचायत ने तातडीने करावा व गांधीनगर सारख्या व्यापार पेठेत जी पाण्याची समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी प्रयत्न करावे व गांधीनगर मधील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावू नये यासाठी योग्य ते नियोजन करून कर्मचाऱ्यांच्या वर लक्ष ठेवावे जेणेकरून कर्मचारी एखाद्या गल्लीत कमी व एखाद्या गल्लीत जास्त पाणी सोडतात त्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे यावेळी गांधीनगर चे सरपंच संदीप पाटोळे,ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांनी भटक्या कुत्र्यांसह पाण्याचा नियोजनाबाबत कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना देऊ व सर्वांना समान पाणी वाटपाबाबत कर्मचाऱ्यांना सूचना देऊ असे आम्हाला आश्वासित करण्यात आले यावेळी गांधीनगर चे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवेदन स्वीकारले
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, ग्राहक सेना तालुकाप्रमुख जितेंद्र कुबडे, फेरीवाले संघटना उपतालुकाप्रमुख बाळासो नलवडे, विभाग प्रमुख दीपक पोपटाणी, विभाग प्रमुख वीरेंद्र भोपळे, विभाग प्रमुख विनोद रोहिडा, गांधीनगर उपशहर प्रमुख दीपक पोपटाणी, शाखाप्रमुख सुनील पारपाणी, शिवाजी लोहार, अजित चव्हाण, किशोर कामरा, कैलास जाधव, रामराव पाटील, वसंत पोवार, नमेश चव्हाण, बाबुराव पाटील, धनंजय पाटील आधी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते











