हातकणंगले प्रतिनिधी – कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथील चिमुरडी स्वरा उपाध्ये हिला न्याय मिळावा आणि हातकणंगले तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
स्वरा हत्याप्रकरणातील फरार आरोपीला तातडीने अटक करावी, खटला जलदगती न्यायालयात चालवावा, ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, पावसातील मोठ्या खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्याने हातकणंगले तालुक्याचा विशेष बाब म्हणून दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.











