Edition

शिंगणापूर मुख्य मार्गावरील ‘खांडसरी नाका’ परिसरात बिबट्याचे दर्शन, वनविभाग कडून शोधमोहीम सुरू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिंगणापूर, प्रतिनिधी – ता.११ : शिंगणापूर मुख्य मार्गावरील ‘खांडसरी नाका’ परिसरात शनिवारी (ता.१०) मध्यरात्री सतीश तानाजी पाटील (वय ३६, रा. हणमंतवाडी, ता. करवीर) या तरुणाला  बिबट्याचे दर्शन झाले.
प्रत्यक्षदर्शी ने सांगितलेल्या घटनेवरून मिळालेली अधिक माहिती अशी, पाटील हे त्यांचे मोठे बंधू हर्षद पाटील यांच्यासोबत ट्रॅक्टर मधून रात्री त्यांच्या घरी हणमंतवाडी कडे परतत होते. ‘खांडसरी नाका’ पासून पुढे गेल्यावर ‘योगेश माने’ यांच्या ट्रेडर्स गोडावून परिसरात बिबट्या ने त्यांच्या ट्रॅक्टर समोरून ट्रेडर्स गोडावून च्या पिछाडिस असलेल्या शेतात उडी मारल्याचे प्रत्यक्ष पाहिले. तसेच शिंगणापूर मार्गावरील ‘दत्तनगर’ मधील काही महिला पहाटे ४ च्या सुमारास फिरायला गेल्या असता ‘चंबुखडी टाकी’ परिसरात बिबट्या दिसल्याचा त्यांच्याकडून दावा करण्यात आला आहे. बिबट्या पुन्हा ‘लक्षतीर्थ वसाहत – फुलेवाडी’ च्या दिशेने वेगाने गेल्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभाग कडून करण्यात आले आहे.

*प्रतिक्रिया*
बिबट्याच्या शोधासाठी तत्काळ टिम ला पाचारण करण्याच्या सूचना देत देत आहे. ड्रोन च्या सहाय्याने परिसरात बिबट्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
आप्पासाहेब बुरटे, वनपाल, करवीर

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

traffic tail

error: Content is protected !!