
कोल्हापूर प्रतिनिधी – विवेक पाटील, शिंगणापूर, ता १५ : हणमंतवाडी येथे आयोजित हणमंतवाडी हायस्कूल येथे ‘स्वर्गीय प्रकाशभाई शहा’ यांचा स्मृतीदिन विविध उपक्रमांनी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
यावेळी, मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर च्या प्रमुख वक्त्या ‘सुषमा पाटील’ यांनी पालक व विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत ‘आजचा विद्यार्थी व त्यांची जबाबदारी’ या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, विद्यार्थीदशेत घेतलेले निर्णय आणि लावलेल्या चांगल्या सवयी भविष्यातील व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिस्त, सकारात्मक विचार आणि ‘जबाबदारीची जाणीव ठेवून आपले भविष्य घडवावे’, असे प्रेरणादायी विचार पाटील यांनी मांडले. ‘करवीर सिटीजन फोरमचे अध्यक्ष’ शिवाजी नरके यांनी ‘स्वर्गीय प्रकाशभाई शहा’ यांच्या समाजसेवेच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा हणमंतवाडी हायस्कूलचे ‘मुख्याध्यापक’ के. एस. पोतदार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.











