ं
संजय आगाशे ,चंदगड प्रतिनिधी चंदगड:
तालुक्यातील बोंजुर्डी गावातील होतकरू तरुण कु. कृष्णा प्रकाश पाटील यांनी आपल्या उल्लेखनीय यशाने संपूर्ण चंदगड तालुकə आणि कोल्हापूर जिल्हçāचे नाव उज्ज्वल केले आहे. माझगाव डाक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited) मध्ये झालेल्या परीक्षेत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून तिसऱ्या (३ व्या) क्रमांकाने यश संपादन केले आहे. या सुवर्णयशाच्या बळावर त्यांची ‘माझगाव डाक शिपबिल्डर्स लिमिटेड’ मध्ये निवड झाली आहे.
कु. कृष्णा पाटील यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल बोंजुर्डीसह संपूर्ण चंदगड परिसरातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. ग्रामीण भागातील तरुणाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेल्या या यशाबद्दल नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.











