रायबाग | प्रतिनिधी : तालुक्यातील भेंडवड गावातील विरक्त मठ व ऐतिहासिक रेवणसिद्धेश्वर मंदिराच्या जमिनीच्या प्रकरणात वनविभागाने हस्तक्षेप करू नये, अशी मागणी विरक्त मठाचे गुरुसिद्ध स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली भाविकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी तहसीलदार महादेव सनमुरी यांना देण्यात आले.
यावेळी गुरुसिद्ध स्वामीजी म्हणाले की, भेंडवड गावातील जमीन रजि. क्र. ४१ मध्ये रेवणसिद्धेश्वर मंदिर व विरक्त मठ अस्तित्वात असून, मंदिराच्या ताबा व व्यवहारासह मंदिर आणि मठाच्या जीर्णोद्धाराच्या कामात वनविभागाने हस्तक्षेप करणे योग्य नाही.
रेवणसिद्धेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन व ऐतिहासिक असून, त्यासंदर्भातील नोंदी विविध सरकारी कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच भेंडवड गावाच्या अधिकृत नकाशामध्येही रेवणसिद्धेश्वर मंदिराचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मंदिर व मठाच्या पारंपरिक हक्कांमध्ये कोणताही हस्तक्षेप करू नये, अशी मागणी भाविकांनी केली.
निवेदन देताना अधिवक्ता व्ही. एस. पुजारी, निंगाप्पा पकंडी, अप्पू पकंडी, हणमंत अलगुंडी, सिद्दू कबाडगे, रेवणू शिवापुरे, परसराम पकंडी, रवी पुजेरी, सिद्धप्पा कदम, आनंद सवदी, महांतेश बदामी, संजय पुजेरी, शंकर हल्लादमणी, प्रवीण हंजे, अण्णा पुजेरी, हणमंता पकंडी आदी भाविक उपस्थित होते.










