Edition

सेलू ला मराठवाड्यातील सर्वांत सुंदर शहर बनवणार- ना.मेघना बोर्डीकर.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सां.बा. उपविभागाचे कार्यालय व निवास इमारतीचे लोकर्पण.

सेलू : सेलू मतदार संघाचा सर्वांगीन विकास हेच माझे ध्येय आहे पण सेलू शहर हे मराठवाड्यातील सर्वात सुंदर शहर बनवणे हे माझे स्वप्न आहे. भविष्यात शहरासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेज व गॅस हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबण्याचा मानस आहे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले. सेलू येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या 8 कोटी 75 लाखांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारत व 13 कर्मचारी निवासस्थान इमारतीचे लोकार्पण करताना उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.या वेळी अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष मिलिंद सावंत, प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, सांबा विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय जाधव, तहसीलदार डॉ शिवाजी मगर, उपविभागीय अभियंता बालाजी शिंदे, उपअभियंता बळीराम माने, पप्पू डोंबे, डॉ आशिष डख, उपसभापती माऊली घुगे, तालुकाध्यक्ष गणेश काटकर, अशोक शेलार , संजय लोया यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ए आर एम कॅन्स्ट्रक्शनचे अतिश मालाणी , सागर श्रीबल्लभ लोया, पल्लवी कन्स्ट्रक्शनचे योगेश जैन, आर. बी. घोडके व उपअभियंता बळीराम माने यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय जाधव सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर श्रद्धा घोडके यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक अभियंता राहूल वाघमारे, श्रीहरी हंबर्डे, खराडे, श्रीमती मोरे मॅडम, दिपक शिर्के, सिद्धार्थ सूर्यवंशी, शिंदे व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

माणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या सर्व चौकटी मोडून टाकणं ही आजच्या शिक्षकांची जबाबदारी : हिंदुराव हुजरे-पाटील ———– आमदार प्रा. जयंत आसगावकर, डॉ. हरीश भालेराव नॅशनल आयडियल टीचर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

traffic tail

माणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या सर्व चौकटी मोडून टाकणं ही आजच्या शिक्षकांची जबाबदारी : हिंदुराव हुजरे-पाटील ———– आमदार प्रा. जयंत आसगावकर, डॉ. हरीश भालेराव नॅशनल आयडियल टीचर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

error: Content is protected !!