
डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू :सेलू येथील समता नगर मधील नगर परिषदेच्या वतीने 1 कोटी रुपये विकास निधीतून उभारण्यात आलेल्या नमो उद्यानाचे पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष मिलिंद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार डॉ.शिवाजी मगर उपनगराध्यक्ष साईराज बोराडे माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, मुख्याधिकारी महेश गायकवाड बांधकाम सभापती मनीष कदम दिनकर वाघ , पप्पू डोंबे , डॉ. आशिष डख, नप सदस्य दीपक कोल्हाळ शांताबाई ठाकूर रामेश्वर काजळे गणेश सवणे, उरुजलाला ,सुबोध काकडे भाऊसाहेब सोनवणे बाळासाहेब झमकडे शेख रहीम गणेश काटकर अशोक शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती .यावेळी नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या देववन मिया वाकी घनवन प्रकल्पाला भेट देण्यात आली तसेच मोकाट श्वान निर्भीजीकरण एबीसी सेंटर व निवारा केंद्र याचेही उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाची प्रास्ताविक नगराध्यक्ष मिलिंद सावंत सूत्रसंचालन विजय चौधरी तर मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी आभार मानले राम मंदिर समितीच्या वतीने पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला तसेच नमो उद्यानाच्या कोणशिलेचे उद्घाटन अनावरण पालकमंत्री मेघना साकोरे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रामाच्या यशस्वितेसाठी न प च्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.










