Edition

सेलू तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन.

सेलू : दि.04 मागील दोन महिन्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने सेलू तालुक्यातील खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे सेलू तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट आर्थिक मदत द्यावी, तसेच मागील वर्षाचा रखडलेला व चालू वर्षाचा पीक विमा तातडीने वितरित करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.माजी आमदार विजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्याद्वारे, पावसाअभावी आणि कडक उन्हामुळे सोयाबीन, कापूससह इतर सर्व खरीप पिके व फळबागांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून, पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, असे निवेदनात नमूद करीत नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया न राबविता बाधित शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी. मागील वर्षाचा रखडलेला पीक विमा तातडीने खात्यावर जमा करावा आणि चालू खरीप हंगामातील पीक विम्याची अंतरिम मदतही द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. पावसाच्या खंडाची गंभीर दखल घेऊन सेलू तालुका दुष्काळग्रस्त किंवा कमी पावसामुळे प्रभावित क्षेत्र म्हणून जाहीर करावा. तसेच शेतकर्‍यांना वीज बिलात सवलत, कर्जवसुलीस स्थगिती आणि अन्य शासकीय सवलती तातडीने द्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान, यावेळी माजी आमदार भांबळे, राजेंद्र लहाने, अपासाहेब डख, प्रकाश मुळे, पुरुषोत्तम पावडे, मिलिंद पवार, शरद आकात, चंद्रकांत गाडेकर, जीवन आवटे, शुभम कदम, प्रदीप रोडगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!