Edition

जंगमहट्टीतून १७ वर्षीय मुलगा बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

_फूस लावून अज्ञात व्यक्तीने घेऊन गेल्याची तक्रार; चंदगड पोलिसांकडून तपास सुरू_

संजय आगाशे,चंदगड प्रतिनिधी

चंदगड : जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील १७ वर्षीय मुलगा अज्ञात व्यक्तीने फूस लावून अज्ञात कारणासाठी घेऊन गेल्याची तक्रार चंदगड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद प्रकाश हुंदळेकर (वय १७ वर्षे ४ महिने) हा २९ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास जंगमहट्टी गावातून बेपत्ता झाला. मुलगा घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला.

मात्र बराच शोध घेऊनही हर्षदचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्याची आई योगिता प्रकाश हुंदळेकर यांनी चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

मुलगा बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून,पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यासाठी आवश्यक तपास सुरू आहे. परिसरातील नागरिकांनीही मुलाबाबत काही माहिती मिळाल्यास ती तातडीने पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!