Edition

लोहा मार्केटमध्ये शिस्तबद्ध पार्किंगची मागणी; वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर/प्रतिनिधी:उदय साळुंखे

गडमुडशिंगी पैकी
गांधीनगर ता.करवीर परिसरातील लोहा मार्केटमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या सर्रास रस्त्यावर लावल्या जात असल्याने, मोठी अडचण निर्माण होत आहे. येथे सुभाष पार्किंगची चांगली व्यवस्था उपलब्ध असूनही, नियमांचे उल्लंघन करून कुठेही गाड्या पार्क केल्या जात आहेत. यामुळे स्थानिक नागरिक आणि इतर वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
अवैध पार्किंगमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची गंभीर दखल आता घेण्यात आली असून, यापुढे संबंधित वाहनचालकांवर कडक पोलीस कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. पार्किंगसाठी निर्धारित केलेल्या जागेचाच वापर करावा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, हे स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिक आणि ग्राहकांनी शिस्तीचे पालन करून सहकार्य करावे, जेणेकरून लोहा मार्केट परिसर सर्वांसाठी सुरक्षित आणि मोकळा राहील, असे आवाहन करण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!