पुणे प्रतिनिधी शंकर जोग, दलित पॅंथर संघटनेतर्फे जिल्हा युवक, अल्पसंख्यांक आणि इतर पदांवर पुणे शहर आणि राज्यातील कार्यकर्त्यांच्या पदनियुक्त्या नुकताच जाहीर करण्यात आल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी नवी पेठ येथील श्रमिक पत्रकार श्रमिक पत्रकार भवन मध्ये पत्रकार परिषदेत दिली.
दलित पॅंथरच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रफिक भाई कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली. तर पुणे शहर अध्यक्ष पदासाठी प्रकाश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली.पुणे शहर युवक अध्यक्ष पदासाठी राहुल सोनवणे यांची निवड करण्यात आली. पुणे जिल्हा युवक अध्यक्षपदी विक्रम कांबळे.दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.
यावेळी दलित पॅंथर पुणे शहर अध्यक्ष प्रकाश साळवे, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष शुभम सोनवणे, पुणे शहर युवक अध्यक्ष राहुल सोनवणे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष विक्रम कांबळे, नयन शेख, शुभम माने, विजय शिरसाठ आदि उपस्थित होते.











