Edition

उचगावच्या साईराम हॉस्पिटलची भरारी; डॉ. मंगेश माने व डॉ. मेघना माने दाम्पत्याने जपली माणुसकी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

करवीर: प्रतिनिधी
उदय साळुंखे

उचगावच्या साईराम हॉस्पिटलने गेली आठ वर्षे मानवसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे दाखवून दिले.डॉ. मंगेश माने व डॉ. मेघना माने या दाम्पत्याने वैद्यकीय क्षेत्रात आपली माणुसकी जोपासली आहे. असे प्रतिपादन लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांनी केले.
उचगाव येथील साईराम हॉस्पिटलच्या वत्तीने ग्रामपंचायत कर्मचारी,पदाधिकारी, स्वच्छता कर्मचारी यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य नामदेव वाईगडे(एन. डी) होते.
यावेळी शिवाजीराव माने, डॉ. मंगेश माने, डॉ. मेघना माने यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आठ वर्षापूर्वी माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या हस्ते आणि आम. सतेज पाटील, श्री. काडसिद्धेश्वर स्वामीजी,यांच्या प्रमुख उपस्थितीत साईराम हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलं होतं. तेव्हा पासून गेली ८ वर्ष आरोग्य सेवा हाच धर्म मानून स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. मंगेश शिवाजीराव माने आरोग्यसेवा देत आहेत.

यावेळी जि. प. सदस्य नामदेव वाईंगडे, उचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांच्या हस्ते स्व.डॉ. डी.वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून. दोन मिनिटांचं मौन पाळून डी. वाय. पाटील दादांना श्रद्धांजली अर्पण केली.

डॉ. मंगेश शिवाजीराव माने म्हणाले की ,उचगाव हे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीत मोठं गाव आहे. त्यामुळं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर याचा ताण येतो. दिवसरात्र सेवा देताना आपल्या आरोग्याकडंहे कर्मचारी दुर्लक्ष करतात. त्यामुळं त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी या उद्देशानं हे शिबीर आयोजित केल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये युवा ग्रामीण विकास संस्था आरोग्य प्रतिबंध विभाग, ओम हॉस्पिटल तर मोफत रक्त तपासणी, इसीजी, डोळे तपासणी करून आवश्यकते नुसार औषधं देण्यात आली. सर्वाधिक लाभ हा ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घेतला.

प्रास्ताविक डॉ. मंगेश माने यांनी केले.सूत्र संचालनआरोग्य मित्र मोहन सातपुते यांनी केले.
या कार्यक्रमास माजी आम. ऋतुराज पाटील,शिवाजीराव माने, डॉ. मेघना माने, उपसरपंच अरविंद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर रंगराव चव्हाण, विनायक हावळ ग्रामपंचायत सदस्य विराग करी, ,पृथ्वीराज पाटील ,समुपदेशक प्रल्हाद कांबळे, जनसंपर्क अधिकारी पांडुरंग कांबळे,यांच्यासह हॉस्पिटलचा सर्व कर्मचारी उपस्थित होता.

फोटो ओळ: उचगाव येथील साईराम हॉस्पिटलच्या वत्तीने घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर प्रसंगी लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांचा सत्कार करताना डॉ मंगेश माने व मान्यवर उपस्थित होते
(छाया; उदय साळुंखे)

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!