ईश्वरपुर शहरांमधे महावितरण कंपनीच्या माध्यमातून विज ग्राहकांना विनाकारण जोर जबरदस्ती करुण स्मार्ट मिटर बसविण्याचा सपाटा लावला आहे ही हुकुमशाही आम्ही कदापी ही खपवुन घेणार नाही .शहर व उपनगरातुन अनेक विज ग्राहकांमध्ये स्मार्ट मिटर मनमानी कारभार करत बसविलेले आहेत त्या मिटर धारकांना 300/रु ऐवजी 1000/ते 1500/रु पर्यंत बिल येऊ लागले असल्याने विज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे ज्या विज ग्राहकांनी स्मार्ट मिटर बसविण्यास नकार दिला आहे त्याचा महावितरण कंपनीकडुन मानसिक छळ सुरू आहे याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे असा आरोप सय्यद यांनी केला आहे . ज्या विज ग्राहकांनी स्मार्ट मिटर बसविण्यास नकार दिला आहे त्याचे रीडीग न घेता अव्वाच्या सव्वा बिल पाठवुन मानसिक त्रास देऊन स्मार्ट मिटर बसविण्यास विज ग्राहकांना भाग पाडत असल्याचे ही मत सय्यद यांनी व्यक्त केले आहे . महावितरण कंपनीकडुन बसविले ले स्मार्ट मिटर तत्काळ काढुन पुर्ववत मीटर बसवावेत व मिटर चे रीडीग वेळच्या वेळी घेऊन विज ग्राहकांना सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कंपनीला सय्यद यांनी या प्रेस नोट द्वारे केलै आहे . तसेच ईश्वरपुर शहर व उपनगरातील विज ग्राहकांना 1सप्टेबंर मंगळवाररोजी सकाळी ठीक 11वाजता क्रांतीसिंह नाना पाटील यांचे पुतळ्यास अभिवादन करून सांगली महावितरण कंपनी विश्राम बाग यैथे सागंलि जिल्ह्य स्मार्ट मिटर हटाव कृती समिती च्या वतिने आक्रोश मोर्चा मधे मोठ्या संख्येने सहभागी होऊन हुकुमशाही मोडीत काढून विज ग्राहकांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी या आंदोलनात स्मार्ट मिटर हटाव लोकशाही बचाव अशा घोषणा देत चलो सांगली चलो सांगली असा गजर करत झोपे चे सोंग घेणाऱ्या सरकार ला जाग आणण्यासाठी या मोर्चा मधे मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या प्रेस नोट द्वारे माजी नगरसेवक शकिल सय्यद ऊरूण ईश्वरपुर नगरपरिषद ईश्वरपुर यांनी केले आहे
हे आंदोलन स्मार्ट मिटर हटाव कृती समिती सांगलि जिल्ह्याच्या वतिने मा.चंदन चव्हाण यांचे नेतृत्व खाली होणार असल्याचे ही सय्यद यांनी माहिती दिली











