Edition

शेडगेवाडीच्या बाजारपेठेत भरदिवसा बिबट्याचा थरार; सरपंचांवर धावून आला!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा प्रतिनिधी: शेडगेवाडी येथील बाजारपेठेत शुक्रवारी भरदिवसा बिबट्या शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शरद पाटील यांच्या घराजवळील बागेत बिबट्या आढळून आल्याची माहिती मिळताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांना सुरक्षित अंतरावर राहण्याच्या सूचना दिल्या जात असतानाच बिबट्याने सरपंच तानाजी नाटूलकर यांच्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पुन्हा बागेतील झाडीत लपला.
दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बागेला तारेचे कुंपण असल्याने बिबट्याला बाहेर पडता येत नव्हते. वनविभागाच्या पथकाने ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दाट झुडपांमध्ये लपल्याने ड्रोनद्वारेही त्याचा ठावठिकाणा स्पष्टपणे लागला नाही.
यानंतर रेस्क्यू टीमने बिबट्याला पकडण्यासाठी बागेत प्रवेश केला. पथकाची चाहूल लागताच बिबट्याने उंच झाडावर चढून तेथून बागेच्या बाहेर उडी मारली आणि डोंगराच्या दिशेने धूम ठोकली. त्यामुळे बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.
महिनाभरापासून नागरी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला असून, वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!