Edition

तवंदी डोंगराच्या पायथ्याशी इसमाचा दगडाने ठेचून खून; निपाणीत खळबळ.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

निपाणी वृत्तसेवा – निपाणी शहराजवळील तवंदी डोंगराच्या पायथ्याशी एका इसमाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने निपाणी परिसरात खळबळ उडाली आहे. महमंद समशेर खलिफ (वय ५२, रा. हिटणी, ता. गडहिंग्लज) असे मृत इसमाचे नाव आहे.

तवंदी डोंगराच्या पायथ्याशी काही नागरिकांना सकाळी एका पुरुषाचा मृतदेह पडलेला दिसून आला. नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच निपाणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

मृतदेहाची तपासणी केली असता चेहऱ्यावर दगडाने मारल्याच्या जखमा आढळून आल्या. त्यामुळे दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी महात्मा गांधी शासकीय रुग्णालयात पाठविला.

मृत महमंद खलिफ हे आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्यात नोकरीस होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.

या प्रकरणी मृताची पत्नी नसिमा यांनी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. खुनामागील नेमके कारण काय, तसेच या घटनेत कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!