Edition

बिळाशी गाव हे क्रांतीकारकाचे गाव येथे राष्टीय स्मारक उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव मांडणार : आमदार सत्यजित देशमुख.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा :बिळाशी (ता. शिराळा) : येथे 1930 रोजी जंगलसत्यागृह,क्रांतीचा सत्यगृह झाला तीन वर्षीने दशकपुर्ती होत आहे.येथे राष्टीय स्मारक व्हावे अशी मागणी शासनाकडे करणार असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केली.
आमदार सत्यजित देशमुख यांच्या माध्यमातून बिळाशी येथे विविध विकासकामांसाठी तब्बल ७३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीतून पूर्ण झालेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात हा सोहळा पार पडला.

यामध्ये लोहार गल्ली रस्ता काँक्रीटीकरणासाठी स्थानिक आमदार निधीतून १० लाख रुपये, शिराळकर गल्ली रस्ता काँक्रीटीकरणासाठी नागरी सुविधांतर्गत ११ लाख रुपये, सांळुखे-यमगर गल्ली रस्ता काँक्रीटीकरणासाठी तांडा वस्ती योजनेंतर्गत १० लाख रुपये, जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे दोन शाळा खोल्यांच्या इमारतीसाठी जिल्हा नियोजनातून २७ लाख रुपये तसेच महादेव मंदिर निवारा शेडसाठी पर्यटन विकासातून १५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

या विकासकामांमुळे गावातील रस्ते, शैक्षणिक सुविधा, धार्मिक व पर्यटनस्थळाच्या सुविधांमध्ये भर पडणार असून, ग्रामस्थांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. आमदार सत्यजित देशमुख यांच्या माध्यमातून गावाच्या विकासाला सातत्याने प्राधान्य दिले जात असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

या कार्यक्रमास माजी सभापती हणमंतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य साईतेजस्वी देशमुख, माजी उपसभापती आनंदराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील, पंचायत समिती सदस्य बाजीराव पाटील, बिळाशी सरपंच सुजाता देशमाने, उपसरपंच सुवर्णा पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ :- बिळाशी ता. शिराळा येथे विविध विकास कामांच्या उदघाटन समारंभ प्रसंगी आमदार सत्यजित देशमुख, माजी सभापती हणंमतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या साईतेजस्वी देशमुख.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!