Edition

ना दुकान, ना गाळा… मोटारसायकलवर राख्यांचा बाजार ! गोरक्षरावांची भन्नाट ‘घरपोच’ सेवा..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली प्रतिनिधी – मोटारसायकलवरून गल्लीबोळात फिरत गोरक्षमरावांचा अनोखा राखी व्यवसाय; स्वस्त राख्या थेट घरपोच देण्याचा १५ वर्षांचा प्रवास..रक्षाबंधनाचा सण जवळ आला की बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी राख्यांची दुकाने सजतात. मात्र, शहरातील दुकानांऐवजी थेट घराघरांत जाऊन राख्या विकण्याचा अनोखा व्यवसाय गेल्या १० ते १५ वर्षांपासून गोरक्षराव नाथ गोसावी करत आहेत.
गोरक्षमराव मोटारसायकलवर राख्यांचा साठा घेऊन गल्लीबोळातून फिरतात. महिलांना आणि बहिणींना त्यांच्या पसंतीच्या राख्या घराच्या दारातच उपलब्ध करून देतात. विशेष म्हणजे दुकानातील राख्यांच्या तुलनेत परवडणाऱ्या दरात राख्या देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
“दुकानापर्यंत जाण्याची गरज नाही. मी स्वतः मोटारसायकलवरून प्रत्येक दारापर्यंत राख्या घेऊन जातो. त्यामुळे महिलांना त्यांच्या बजेटमध्ये राख्या मिळतात. त्यातून मला देखील माझ्या कुटुंबाला हातभार लावणारा व्यवसाय करता येतो,” असे गोरक्षराव सांगतात.
रक्षाबंधनाच्या सणापुरता मर्यादित असला तरी हा व्यवसाय त्यांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीचा आणि थेट ग्राहकांशी जोडलेल्या विश्वासाचा भाग बनला आहे. मोठ्या दुकानांमध्ये वाढणारा खर्च आणि बाजारातील दर यापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारत, घरपोच राखी विक्रीतून कष्टाला प्रतिष्ठा देणाऱ्या गोरक्षमरावांचा हा व्यवसाय परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

 

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!