Edition

वाद मिटविण्यास गेलेल्या हॉटेल मॅनेजरचा दगडाच्या घावाने मृत्यू; दोघे ताब्यात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

यड्राव प्रतिनिधी : यड्राव येथील पर्वती इंडस्ट्रियल इस्टेटमधील हॉटेल अॅकॉर्ड इंटरनॅशनलच्या बाहेर सुरू असलेला वाद सोडविण्यास गेलेल्या हॉटेल मॅनेजरचा दगडाने मारहाण केल्याने मृत्यू झाला. अल्बर्ट हॅरीबेनी एम्ब्रोस (वय 53, रा. समतानगर, मिरज, जि. सांगली) असे मृत मॅनेजरचे नाव आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
गंगा प्रविण पाटील (वय 21, रा. यड्राव, ता. शिरोळ) आणि अशपाक सिकंदर नदाफ (रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी हॉटेल मालक प्रसाद शुभन्ना शेट्टी (वय 58, रा. तिरंगा चौक, पुजारी मळा, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 ऑगस्ट रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास दोन्ही संशयित हॉटेलबाहेर एका महिलेशी वाद घालत होते. हा प्रकार पाहून मॅनेजर एम्ब्रोस वाद मिटविण्यासाठी तेथे गेले. यावेळी वाद वाढून मारामारी झाली. त्यात गंगा पाटील याने एम्ब्रोस यांच्या डोक्यात दगड मारल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी 23 ऑगस्ट रोजी पहाटे 5.48 वाजता भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103(1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!