Edition

सांगलीत गांजावर LCB ची मोठी कारवाई,तब्बल 300 किलो गांजा जप्त, गांजा तस्करी करणारे वाहन ताब्यात घेत १ कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली प्रतिनिधी – दि. २०: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या वाहनास ताब्यात घेत ३०० किलो गांजासह एकूण एक कोटी पासष्ट लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करी व विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व पथकाला याबाबत सूचित केले होते.
दि. २०.०८.२०२६ रोजी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मंगेश प्रकाश मोरे (वय ४६, रा. बोरजाईवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) हा त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड गाडी (क्र. NL-01-AD-9366) कंटेनरमधून तयार गांजा घेऊन मिरज ते पंढरपूर रस्त्याने वाहतूक करणार आहे. त्यानुसार मिरज-पंढरपूर महामार्गावरील तानंग फाटा येथे सापळा रचून वाहन ताब्यात घेण्यात आले. कंटेनरच्या ड्रायव्हर केबिनमधील कप्प्यातून चिकटपट्टीने गुंडाळलेले पॅकेट मिळाले असता, त्यात अंदाजे ३०० किलो वजनाचा हिरवट काळपट रंगाचा तयार गांजा आढळून आला.
चौकशीत संशयित आरोपीने हा गांजा बालेघाट ते तुंबडी राज्य-ओडिशा दरम्यान असणाऱ्या एका शेतामधून आणल्याचे व पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले. सहा. पोलीस निरीक्षक निशाणदार यांनी दोन शासकीय पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करून गांजा व वाहन ताब्यात घेतले.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व मा. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्यासह सपोफौ सुभाष सूर्यवंशी, पोहेकॉ सागर लवटे, संदीप गुरव, अतुल माने, नागेश खरात, अनिल कोळेकर, सतीश माने, द-याप्पा बंडगर, संदीप नलावडे, अमीरशा फकीर, सागर टिंगरे, सोमनाथ गुंडे, अमर नरळे, अरुण पाटील, संकेत मगदुम, पोकॉ विक्रम खोत, बाळू सुतार, सूरज थोरात, सोमनाथ पतंगे, चापोहेकॉ मोतीराम खोत, पोकॉ महेश कुंभार तसेच सायबर पोलीस ठाणे कडील कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील यांनी केली आहे.
आरोपीकडून गांजा नेमका कोणाला विकला जाणार होता, याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!