Edition

सत्तेवाडी स्मशानभूमीत २२५ वृक्षांची लागवड; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी चंदगड सत्तेवाडी : श्री.संभाजीराव देसाई यांच्या सहकार्याने आणि सत्तेवाडी ग्रामस्थांच्या सहभागातून गावच्या स्मशानभूमीत आज पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मोहगुनी, सुपारी, नारळ आदी विविध प्रकारच्या तब्बल २२५ झाडांची लागवड करण्यात आली.

गावातील सार्वजनिक ठिकाणी हिरवाई वाढविणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे तसेच भावी पिढीसाठी स्वच्छ व सुंदर वातावरण निर्माण करणे, या उद्देशाने हा वृक्षारोपण उपक्रम आयोजित करण्यात आला. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत झाडे लावली.

वृक्षलागवडीनंतर या रोपांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारीही ग्रामस्थांनी घेण्याचा निर्धार व्यक्त केला. स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड झाल्याने आगामी काळात या परिसराचे सौंदर्य वाढण्यासोबतच पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होणार आहे.

‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. सामूहिक सहभागातून राबविलेल्या या उपक्रमामुळे सत्तेवाडी गावाने पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश दिला आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!