Edition

कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ उत्साहात संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

परभणी : दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी परभणी शहराच्या आरोग्य क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ राज्याच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. नामदार सौ. मेघनादीदी साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्यास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, फीत कापून हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक यंत्रसामग्री, सुसज्ज विभाग, आधुनिक ऑपरेशन थिएटर, आयसीयू व इतर वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. उपस्थित मान्यवरांनी अल्पावधीत उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक आरोग्यसेवा केंद्राचे विशेष कौतुक केले.उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मा. नामदार सौ. मेघना दीदी साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, आरोग्य ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असून गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचणे ही काळाची आवश्यकता आहे. कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील नागरिकांना महानगरांच्या तोडीच्या आधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि रुग्णकेंद्रित सेवा यामुळे हे हॉस्पिटल जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल.त्या पुढे म्हणाल्या, रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात उत्कृष्ट आरोग्यसेवा देण्याचा हा उपक्रम निश्चितच समाजहिताचा आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक रुग्णांना उपचारासाठी औरंगाबाद, पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या या उपक्रमासाठी संचालक मंडळ, डॉक्टर व संपूर्ण टीम अभिनंदनास पात्र आहे. भविष्यात हे हॉस्पिटल केवळ परभणी जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यासाठी एक आदर्श आरोग्यसेवा केंद्र म्हणून ओळखले जाईल, असा मला विश्वास आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून ग्रामीण भागात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. आधुनिक सुविधा, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर यांच्या माध्यमातून रुग्णांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमास मा. श्री. रत्नाकर गुट्टे आमदार गंगाखेड विधानसभा, मा. सौ. लताबाई वाकडे जि. प. अध्यक्ष अध्यक्षा परभणी, मा. श्री. हरिभाऊ काका लहाने माजी आमदार, मा. सय्यद इकबाल महापौर परभणी शहर म.न.पा., मा. श्री. गणेश देशमुख उपमहापौर परभणी शहर म.न.पा., मा.श्री. विक्रांत विटेकर मा. सौ . वैशाली जाधव सभापती जि. प. परभणी, मा.सौ. ऐश्वर्या चव्हाण सभापती जि.प. परभणी, मा.सौ. कौशल्याबाई शिंदे सभापती जि. प. परभणी, मा. सौ. पार्वतीबाई मुंडे सभापती जि. प. परभणी, मा. डॉ. संजय रोडगे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू, मा. डॉ. सविता रोडगे जिल्हा परिषद सदस्या परभणी, मा. श्री. आनंद भरोसे जिल्हाध्यक्ष शिवसेना, मा. श्री. सुरेश भुमरे जिल्हाध्यक्ष भाजपा, मा. श्री. रविराज देशमुख जिल्हाध्यक्ष काँग्रेस, मा. श्री. अजय गव्हाणे जिल्हाध्यक्ष रा.का. श.प. मा. श्री. शिवाजी भरोसे जिल्हाध्यक्ष भाजपा, मा. श्री. विशाल कदम जिल्हाध्यक्ष शिवसेना, मा.सौ. सारिका पारवे जिल्हाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा, मा. श्री. मिलिंद सावंत नगराध्यक्ष सेलू, मा.सौ. विमलाबाई कदम नगराध्यक्ष पूर्णा , मा. सौ. मंगल शिरसकर नगराध्यक्ष पालम, मा. श्री. रवींद्रनाथ चव्हाण अधिष्ठाता शा. वै. महाविद्यालय परभणी, मा. श्रीधरराव पारवे जिल्हा परिषद सदस्य, मा. श्री. गणेशराव काटकर तालुकाध्यक्ष भाजपा सेलू, मा. सौ. मनीषा जाधव महानगर अध्यक्ष महिला मोर्चा भाजपा. यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, २४x७ आपत्कालीन व ट्रॉमा सेवा, सुसज्ज ICU, NICU व PICU, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी व लॅबोरेटरी सेवा, इन-हाऊस फार्मसी, डे-केअर सुविधा तसेच विविध वैद्यकीय विभागांची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. स्त्रीरोग व प्रसूती विभाग, अस्थिरोग विभाग, सामान्य शल्यचिकित्सा विभाग, रेडिओलॉजी विभाग, बालरोग विभाग, जनरल मेडिसिन, नेत्ररोग विभाग, फिजिओथेरपी विभाग आदी विशेष विभागांद्वारे रुग्णांना सर्वसमावेशक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन डिलिव्हरी, वंध्यत्व उपचार, सांधेदुखी व सांधे प्रत्यारोपण, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, हाडांचे आजार व फ्रॅक्चर उपचार, नेत्र शस्त्रक्रिया, नवजात बालकांची तपासणी व उपचार, लसीकरण तसेच गंभीर रुग्णांसाठी सुसज्ज आयसीयू सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यावेळी डॉ. संजय रोडगे, डॉ. गणेश पारवे, डॉ. सविता रोडगे, डॉ. अपूर्वा पारवे रोडगे, डॉ. आदित्य रोडगे तसेच हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थितांना हॉस्पिटलच्या संकल्पनेविषयी व उपलब्ध सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली. रुग्णांना केवळ उपचारच नव्हे तर विश्वास, आपुलकी, सुरक्षितता आणि मानवी संवेदनांनी परिपूर्ण आरोग्यसेवा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी आधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेल्या या हॉस्पिटलचे स्वागत करत संचालक मंडळाचे अभिनंदन केले आणि परभणी जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभारप्रदर्शन यथोचित पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, डॉक्टर, कर्मचारी, स्वयंसेवक आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानण्यात आले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!