Edition

उचगाव हद्दीमध्ये मेंढपाळावर वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा: जीवितहानीमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर प्रतिनिधी – गडमुडशिंगी ता. करवीर येथील मेंढपाळ जयराम धुळाप्पा पुजारी यांच्या मेंढरांवर खत कारखान्या मागे विकास कॉलनी उचगाव हद्दीमध्ये ओढवलेला प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहे. तीन मेंढरांचा मृत्यु केवळ वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे, हे स्पष्ट दिसते. या दुर्घटनेमुळे गरीब मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यासोबतच, मेंढरं चारण्यासाठी गेलेल्या आई आणि मुलीवर जो आघात झाला आहे, ते अत्यंत वेदनादायी आहे. त्या दोघी डोळ्यांसमोर आपल्या कुटुंबाचा आधार असलेल्या मुक्या जनावरांना मृत्युमुखी पडताना पाहणे हे त्यांच्यासाठी खूप विधारक आहे.
या प्रकरणी वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

error: Content is protected !!