Edition

कोवाडमध्ये एनएसएस विद्यार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय आगाशे,चंदगड प्रतिनिधी | कोवाड :
कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कोवाड येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग आणि ‘माय भारत’ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोवाड येथे स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार १ ते १५ ऑगस्टदरम्यान साजऱ्या होत असलेल्या स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या अभियानांतर्गत कोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, नदीघाट तसेच विविध ठिकाणच्या गटारांची स्वच्छता करण्यात आली. परिसरात साचलेला कचरा, प्लास्टिक तसेच इतर अनावश्यक वस्तू विद्यार्थ्यांनी गोळा करून परिसर स्वच्छ केला. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला.

एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले. स्वच्छ व सुंदर परिसर निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून नियमितपणे स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, नदीघाट आणि परिसरातील सार्वजनिक ठिकाणांना स्वच्छ व नीटनेटके स्वरूप प्राप्त झाले. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, श्रमप्रतिष्ठा आणि पर्यावरण संवर्धनाची भावना अधिक दृढ होत असल्याचे दिसून आले.

स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!