गांधीनगर:/प्रतिनिधी:उदय साळुंखे
गांधीनगरमध्ये चावला वाईन्ससमोर ३ ते ४ जणांनी किरकोळ कारणावरून दोघांवर लाथाबुक्क्यांनी आणि काचेच्या बाटलीने हल्ला केला. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार गांधीनगर पोलीसच्या समोरच घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.











