

संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी
आज गावातील मराठी विद्या मंदिर प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी श्री दत्तात्रय शिवाजी मनगुतकर तर उपाध्यक्षपदी सौ.ज्योती जोतिबा पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांसह शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व नूतन सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नूतन समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समिती
श्री भरमु विठोबा पाटील — प्रभारी मुख्याध्यापक तथा सचिव नूतन शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.शाळेच्या विकासासाठी समितीच्या माध्यमातून सकारात्मक आणि विधायक कार्य घडावे, अशी अपेक्षा पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.











