Edition

सदलगा येथील श्री.बसवेश्वर प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सदलगा प्रतिनिधी – सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा; संस्थेला १८ लाख ९९ हजार रुपयांचा निव्वळ नफा

सदलगा ता.चिकोडी येथील श्री.बसवेश्वर प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात नुकतीच संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बसवराज गुंडकल्ले होते.

सभेच्या प्रारंभी महात्मा बसवेश्वर तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब गुंडकल्ले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे संचालक सुनील तोरगल यांनी उपस्थित मान्यवर, सभासद, ठेवीदार व हितचिंतकांचे स्वागत केले.
संस्थेचे सचिव सुरेश कुंभार यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सभेसमोर सादर केला.

यावेळी संस्थेचे संचालक डॉ. अनिल मनगुळे यांनी आपल्या मनोगतात संस्थेची आर्थिक व प्रशासकीय वाटचाल याबाबत सविस्तर माहिती दिली. संस्थेचे सभासद, भागभांडवल, विविध निधी, ठेवींचे प्रमाण, कर्जवाटप, आर्थिक व्यवहार, निव्वळ नफा व लाभांश आदी विषयांचा आढावा त्यांनी सभेसमोर मांडला.

अध्यक्षीय भाषणात बसवराज गुंडकल्ले यांनी संस्थेने यंदाच्या आर्थिक वर्षात १८ लाख ९९ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळविल्याचे सांगितले. संस्थेच्या या समाधानकारक आर्थिक कामगिरीबद्दल त्यांनी सभासदांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेच्या सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

“सभासदांचे हित हाच संस्थेच्या कामकाजाचा प्रमुख उद्देश असून, भविष्यातही सभासदकेंद्रित कामकाजाला प्राधान्य दिले जाईल,” असे अध्यक्ष बसवराज गुंडकल्ले यांनी यावेळी स्पष्ट केले. संस्थेच्या प्रगतीमध्ये सभासद, ठेवीदार, कर्मचारी व हितचिंतकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या वार्षिक सर्वसाधारण सभेस डॉ. अनिल मनगुळे, सुनील तोरगल, जयसिंग शितोळे, महावीर उदगावे, अण्णासाहेब डांगे, सचिन कमते, आरती गुंडकल्ले, मेघा माने, श्रवण करंगळे, राजू माने, किरण कोरे, सुरेश उदगावे, उत्तम माने यांच्यासह संस्थेचे कर्मचारी सुरेश कुंभार, राजेंद्र कोगले, व्ही. आर. पाटील, व्ही. आर. डोळ्ळे, पी. ए. गुंडकल्ले, नायकू कमते, एस. आर. कुंभार तसेच शेकडो सभासद, ठेवीदार, हितचिंतक व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी राजेंद्र कोगले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!