Edition

दूधगंगा नदीवरील मलिकवाड–दत्तवाड बंधारा तिसऱ्यांदा वाहतुकीसाठी खुला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मलिकवाड (ता.चिकोडी) येथील दूधगंगा नदीवरील मलिकवाड–दत्तवाड बंधारा तिसऱ्यांदा वाहतुकीसाठी खुला झाला आहे. नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने बंधाऱ्यावरून पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

काही दिवसांपासून दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे मलिकवाडसह दत्तवाड आणि परिसरातील नागरिक, शेतकरी व वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागत होता. आता पाणीपातळी कमी झाल्याने बंधारा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

हा बंधारा कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून, या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, शेतकरी, दुचाकी व चारचाकी वाहनांची ये-जा होत असते. बंधारा खुला झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यास किंवा नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाल्यास बंधाऱ्यावरून वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे नागरिकांनी पाणीपातळी व प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष देऊनच बंधाऱ्यावरून प्रवास करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

विशालक्रांती न्यूज
प्रतिनिधी – अमर माने,
मलिकवाड.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!