Edition

तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या आध्यात्मिक सत्संग सोहळ्याचे कोल्हापुरात रविवारी ९ ऑगष्ट रोजी आयोजन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

यड्राव ( प्रतिनिधी ) :-

संत रामपालजी महाराज नामदान केंद्रा द्वारे सद्‌गुरु संत रामपालजी महाराज यांच्या आध्यात्मिक सत्संग व प्रवचन कार्यक्रमाचे रविवार दि. ९ ऑगष्ट रोजी श्री सिध्दिविनायक मंदिरालगत म.न.पा.प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर ( शाळा नं. ३२ चा हॉल ) जाधववाडी कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले आहे. या सत्संगाच्या माध्यमातून महाराजांचे समस्त मानवजातीला शांती, मोक्ष आणि खऱ्या धर्मज्ञानाच्या मार्गाबद्दल बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे.या प्रवचनात वेद, कुराण, बायबल आणि गुरुग्रंथ साहिब या पवित्र धर्मग्रंथांमधील सखोल आध्यात्मिक ज्ञानाचा उलगडा केला जाईल; तसेच खरी भक्ती कशी करावी, याविषयीचे मार्गदर्शन भाविकांना मिळणार आहे. सध्या समाजात वाढलेली अंधश्रद्धा, भोंदूगिरी, निरर्थक कर्मकांड आणि व्यसनाधीनता यावर या सत्संगात विशेष प्रकाश टाकला जाणार आहे. संत रामपालजी महाराज यांच्या विचारांमुळे हजारो लोक व्यसनमुक्त झाले असून, समाजात मोठे सकारात्मक बदल घडत आहेत. या कार्यक्रमात भक्तीचा खरा मार्ग, ईश्वरप्राप्तीचा सुलभ मार्ग, साधनेचे महत्त्व आणि आत्मशुद्धीकरणाचे तत्त्वज्ञान सोप्या भाषेत मांडले जाईल.

हा सत्संग सोहळा
रविवार, दि.९ ऑगस्ट २०२६
स्थळ: श्री सिद्धिविनायक मंदिरालगत , म.न.पा. प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर (शाळा नं. ३२ चा हॉल), जाधववाडी, कोल्हापूर.येथे होणार आहे तरी सर्वांनी सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!