घोसरवाड, प्रतिनिधी : सकाळी ६ नंतर ते साडेअकरा वाजेपर्यंत दानवाड–कुरुंदवाड मार्गावर एसटी बस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार तसेच सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर घोसरवाड येथील पत्रकारांच्या वतीने कुरुंदवाड आगाराच्या आगार प्रमुख सय्यद मॅडम यांना निवेदन देऊन बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी आगार प्रमुख सय्यद मॅडम यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत लवकरात लवकर बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी माजी सरपंच साहेबराव साबळे, संपादक विजय फडतारे, पत्रकार संजय कोकणे, पत्रकार भुपाल मुगळे, सामाजिक कार्यकर्ते इकबाल दस्तगीर मुल्ला, बापुसो सिद्ध शिंदे, गैबी मुल्ला यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी आगार प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करत दानवाड–कुरुंदवाड बससेवा तातडीने सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.











