Edition

गडमुडशिंगी – गांधीनगर बाबा ग्रुप तर्फे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर/गडमुडशिंगी ता. करवीर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला गांधीनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक किशोर शिंदे तसेच अतुल कदम, व
शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. गडमुडशिंगी च्या सरपंच अश्विनी शिरगावे यांनी आपल्या मनोगतात, अण्णाभाऊंच्या विचारांवर चालून गावच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.
बाबा ग्रुप मंडळाचे अध्यक्ष आकाश ढेरे,
उपाध्यक्ष आकाश धोत्रे, सचिव प्रेम वायदंडे, तसेच
मंडळाचे शिल्पकार बादल वायदंडे यांनी, अण्णाभाऊंच्या महान वारश्याचा अभिमान व्यक्त केला आणि या महाउत्सवाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमादरम्यान रक्तदान शिबिर आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच, पंचकृषीतून सर्वात मोठी मिरवणूक आगामी ५ तारखेला काढण्यात येणार आहे.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य कमिटी हजर होती.
कार्यक्रमाचे आभार माजी डेप्युटी सरपंच गुंडा वायदंडे यांनी केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

error: Content is protected !!