Edition

शेडगेवाडी–नाठवडे मुख्य मार्गावरील बोगद्याजवळील धोकादायक झाड;…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी ते नाठवडे या मुख्य मार्गावरील शेडगेवाडी बोगद्याजवळील एक जुने झाड धोकादायक बनले असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक, विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. झाडाची मुळे उघडी पडल्याने ते कधीही कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या मार्गावरून चांदोली पर्यटनस्थळी जाणाऱ्या पर्यटकांची मोठी वर्दळ असते. तसेच एसटी बस, खासगी वाहने, दुचाकीस्वार आणि स्थानिक नागरिक यांची दिवसभर ये-जा सुरू असते. शाळकरी विद्यार्थीही याच मार्गाचा वापर करत असल्याने संभाव्य अपघाताची भीती व्यक्त होत आहे.
अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेला उभे असलेले हे झाड आता पूर्णपणे जीर्ण झाले आहे. सततचा पाऊस आणि वाऱ्यामुळे झाड अधिक धोकादायक बनले असून, त्याच्या फांद्या व खोड कधीही रस्त्यावर कोसळू शकते. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाने तातडीने या झाडाची पाहणी करून त्याच्या फांद्यांची छाटणी करावी किंवा आवश्यक असल्यास झाड हटवून सुरक्षिततेच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!